*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी ज्येष्ठ लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*झोका*
उपवन झाले सदन फुलून बहरते ग
नव्या नवतीचा झोका झुलतोय ग
नव्या नवरीचं अंग अंग कवळ ग
सखा माझा अनंग चावट भृंग ग
आकाशी धावे मन झाले विहंग ग
नव्या नवतीचा झोका झुलतोय ग
भांगात कोरले श्रावणी सप्तरंग ग
हिंदोळा आशेचा कसे आवरू मन ग
ऐना लुब्ध होऊन मज न्याहळतो ग
नव्या नवतीचा झोका झुलतोय ग
झुल्यात झुलते अंग हळदीचं ग
थांबता थांबेना तो गगनी गेला ग
येता सय श्रीरंगाची भेटी धावे जीव ग
नव्या नवतीचा झोका झुलतोय ग
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664