*कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रॉडक्शन, कमल म्युझिक यांचा संयुक्त उपक्रम*
नाशिक:
कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रॉडक्शन व कमल म्युझिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील पं. सा. नाट्यमंदिर येथे सन्मान महिलांचा २०२५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यात सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ.शैलजा करोडे यांना सन्मानित करण्यात आले.
सन्मान महिलांचा २०२५ या कार्यक्राचे आयोजन सुनील मोंढे यांनी केले तर प्रमुख अतिथी अभिनेत्री व गायिका प्रांजली बिरारी नेवासकर आणि ॲड. सुवर्णा शेपाळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व फ्रेम सन्मानपत्र देऊन उपस्थित पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.