You are currently viewing कागदपत्रे पडताळणी करून तात्काळ नियुक्तीपत्रे द्या…

कागदपत्रे पडताळणी करून तात्काळ नियुक्तीपत्रे द्या…

कागदपत्रे पडताळणी करून तात्काळ नियुक्तीपत्रे द्या…

आरोग्य सेविका उमेदवारांची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर..

सिंधुदुर्गनगरी

आरोग्य सेविका भरती २०२३ अंतर्गत परीक्षा झालेल्या ( ए.एन.एम )उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात यावी.अशी मागणी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उमेदवारांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे म्हटले की, महिला आरोग्य सेविका पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी २०२४ मध्ये उमेदवारांच्या परीक्षा होऊन त्यानुसार १५० उमेदवारांची ऑनलाइन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र अद्याप या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाकडून यासाठी नाहक विलंब केला जात आहे. तरी या भरती प्रक्रियेतील गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांची सरसकट कागदपत्र पडताळणी करण्यात यावी. व त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवाराला नियुक्तीपत्रे देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच न्यायप्रविष्ठ बाब असतानाही फार्मासिसच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ने नियुक्तीपत्रे दिली आहेत . त्याच धर्तीवर महिला आरोग्य सेविका (ए एन एम) भरती २०२३ मधिल सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यातील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात यावी, अशी मागणी आज भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी महिला आरोग्य सेविका परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नंदिनी नाईक, निधी राऊळ, मनीषा मिठबावकर, दिप्ती गोडे, सेजल सावंत, सोनल कदम, अक्षता रावराणे, दर्शना साऊळ आदीसह मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा