You are currently viewing मराठी माणसांच्या गळचेपीसाठी मराठी माणसातील दुफळी कारणीभूत !

मराठी माणसांच्या गळचेपीसाठी मराठी माणसातील दुफळी कारणीभूत !

 

मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून तिथे मराठी भाषा चालणार असे अलिकडे कित्येकदा सातत्याने सांगावं लागतं आहे. तथापि अमराठी माणसांनी आपला आवाज चढवून बोलण्यास सुरुवात केली असून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला राजकीय नेते मंडळी खतपाणी घालत असल्याचे विविध भागातील घडलेल्या प्रकारातून दिसून आले. त्यावर जिथे, जिथे म्हणून मराठी माणसाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तिथं त्याला दाबण्याचा प्रयत्न झाला. खरंतर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना संघटना उदयाला आणली. त्यांचे विभाजन झाल्यानंतर बरीच स्थित्यंतरे झाली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न होत असताना ती खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला गेला. येथून खऱ्याअर्थाने प्रारंभ झाला. दरम्यान त्यापूर्वी नारायण राणे, राज ठाकरे बाहेर पडले. त्यानंतर कै. बाळासाहेब ठाकरे निवर्तले आणि एक एका नेत्यांनी फारकत घेतल्यानंतर जी पडझड सुरू झाली ती एकनाथ शिंदे यांच्या बंडाने सरळ सरळ मोठ्या प्रमाणात घसरण झाली. ती मात्र थांबता थांबत नाही. त्याला केंद्रीय स्तरावरील आशीर्वाद आहेत हे लपून राहिलेले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचा विडा दोन वर्षापूर्वी उचलला गेला. ते बंड साधेसुधे नव्हते. एकाचवेळी चाळीस आमदार जाऊन शिवसेनेत उभी फूट पाडली. यांचे राजकीय, सामाजिक परिणाम मराठी माणसावर झाले. सामान्य माणसाला कुठे जावे? कोणता झेंडा हाती घेऊ अशी मनात अवस्था निर्माण झाली. मग इथूनच मराठी आणि अमराठी वादाला तोंड फुटले महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेत भाजपाला पाठिंबा देणारे सत्तेत असल्याने अधूनमधून जोश वाढला यात सत्ताधाऱ्यांची गुळमुळीत भाषा यामुळे त्यावर काही भाष्य करण्यास तयार नाहीत मग काही केले तरी चालते अशी भावना निर्माण झाली. म्हणूनच भय्याजी जोशी बोलून गेल्यावर सत्ताधारी पक्षातील आमदार त्यांच्या बोलण्याचे समर्थ करताना दिसेल यातून आमच्यात एक वाक्यता नाही हेच दिसून आले. शेवटी कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय अशा घटना घडत नसतात. यामुळे धडा शिकवायचा कसा ? हाच यक्षप्रश्न बनला आहे. अशा प्रसंगातून आम्ही एकत्र आले पाहिजे होते तेच होताना दिसत नाही. याला मराठी माणसातील दुफळी कारणीभूत ठरत आहे.

✒️पत्रकार प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव: 9969252991

प्रतिक्रिया व्यक्त करा