सावंतवाडीत आज दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सालईवाडा येथे एकत्रिकरण
– तालुका कार्यकारीणीची होणार घोषणा
महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समिती या संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २००७ सालापासून संघटीत कामाची सुरुवात झाली होती.
संघटनेचे काम आज अतिशय गरजेचे बनत चालले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊननंतर उद्भवलेली परिस्थिती पाहिली असता कर्जदारांबरोबरच बेरोजगार तरूणांसाठी काम करणे, त्यांना रोजगार विषयी मार्गदर्शन करणे, त्यासाठी योजना आणि बँका यांच्या चक्रव्यूहातुन बाहेर येण्यात मदत करणे यासाठीही आता संघटना रचनात्मक कामही करताना दिसत आहे.
यासाठी सावंतवाडीत युवा वर्ग एकत्र येऊन सावंतवाडी तालुका कार्यकारीणी तयार करत आहे. लवकरच बेरोजगार युवावर्गासाठी मेळाव्याचे नियोजन केले जाणार आहे. आपल्या विविध कर्जविषयक अडचणी, अन्याय, वसुलीतले गैरप्रकार, वाहन कर्ज कंपन्यांची बेकायदेशीर दादागिरी अशा अनेक बाबींविरोधात संघटीत विरोध नोंदवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विचारविमर्श करून निर्णय घेणे गरजेचे असल्याने त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीने केले आहे. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी ॲड. प्रसाद करंदीकर, श्री.अविनाश पराडकर, श्री.दिपक कुडाळकर, श्री. कमलेश चव्हाण, श्री. सादिक डोंगरकर, श्री. मिलिंद केळुसकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. सावंतवाडी तालुका संघटक श्री उमेश सावंत आणि सावंतवाडी अध्यक्ष श्री राजेश साळगावकर यांनी ही माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी किंवा ॲड. प्रसाद करंदीकर, मोबाईल क्रमांक 7774998599 वर संपर्क साधावा, असे आवाहन संघर्ष समिती सावंतवाडीने केले आहे.