You are currently viewing औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाटच्या “स्मार्ट रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त

औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाटच्या “स्मार्ट रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त

औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाटच्या “स्मार्ट रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त

सिंधुदुर्गनगरी 

 मुंबई विभागीय तंत्र प्रदर्शन 2024-25 हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था डॉनबोस्को, कुर्ला येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट च्या “स्मार्ट-रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला, असल्याची माहिती फोंडाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य बो.पी. सोनवणे यांनी दिली आहे.

 या प्रदर्शनासाठी मुंबई विभागाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्हामधून एकूण 53 प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या या मधील उत्कृष्ट 10 प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनासाठी करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO मिधुदुर्ग) चे सहाय्यक वाहन निरीक्षक अरुण पाटील तसेच सहाय्यक वाहन निरीक्षक केतन पाटील यांनी स्वत: औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट या ठिकाणी येऊन प्रतिकृती ची पाहणी केली व विद्यार्थ्यांना राज्य तंत्रप्रदर्शनासाठी शुभेच्या दिल्या. याप्रसंगी अरुण पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्यीना “रस्ता सुरक्षा” या विषयावर तसेच वाहतुकीचे नियम, गोल्डनव्हर्स, गुडसिमेरीटन, गुणवत्तापूर्वक वाहन चालविणे या विषयी मार्गदर्शन केले. या प्रतिकृतीसाठी मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिशियन अॅड इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायाचे शिल्प निदेशक स्वप्रिल विश्वंभरे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

या कार्यक्रमाप्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोडाघाटचे प्राचार्य सोनवणे, तसेच संस्था कर्मचारी आसोलकर, श्री. पाटील, श्रीमती, शार्दुल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन ए. आर. जोशी यानी केले. या कार्यक्रमासाठी गट निदेशक ए.एम. शिरोडकर व शिल्प निदेशक जी. ए. मराठे, एम.एस. मेस्त्री, एस.बी.तळवडेकर, बी. पाटील तमेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा