करुळच्या पुरातन श्री.रामेश्वर मंदिरात दिली अजित नाडकर्णी यांनी भेट
देवळाच्या बाजूला फेन्सिंग करण्यासाठी करणार आर्थिक मदत
फोंडाघाट
आज करुळच्या ५०० वर्षापुर्वीचे श्री.रामेश्वर मंदिरात आज बाहेर ज्या ठिकाणी तरंग येतात त्या ठिकाणी अजित नाडकर्णी यांनी भेट दिली. खरच अदभुत देवस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. तेथील कर्णिक सरपंच आणि देवस्थानचे मानकरी यांनी गार्हाणे घातले. होळी खांबासमोर नारळ ठेवुन गाराणे घातले.मानकरी यांनी केलेल्या कामाचे मोजमापचं होवु शकत नाही.सर्वांनी आदर्श घ्यावा.रामेश्वराच्या अबदारगीरीचेही दर्शन घेतले.अजित नाडकर्णी#शुभांगी नाडकर्णी आणि अखिलेश नाडकर्णी यांच्या वतीने बाजुला फेन्सींग करणार आहेत.त्याला ५००१/- देणगी अजित नाडकर्णी यांनी सरपंच कर्णीक यांना नेण्यास सांगीतले.तुम्ही जे काम करत आहात त्यात हा खारीचा वाटा असे अजित नाडकर्णी म्हणाले.खरचं या भुषणावह कामाचा आदर्श घेवुन गावराठी टिकवणे गरजेचे आहे.सरपंच यांनी उद्या धुळ मारण्याच्या कार्यक्रमाचे नाडकर्णी कुटुंबीयाला निमंत्रण दिले.धन्य ते करुळ गांव धन्य तो श्री.रामेश्वर*