You are currently viewing शिवचरित्र परीक्षेत मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरावर घवघवीत यश.

शिवचरित्र परीक्षेत मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरावर घवघवीत यश.

शिवचरित्र परीक्षेत मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरावर घवघवीत यश.

सावंतवाडी

सिं. जि . शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थिनी मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडीतर्फे आयोजित छत्रपती शिवचरित्र स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले. शिवसंस्कृतीचे जतन व शिवचरांचे मंथन हा विचार व आचार रुजविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या जिल्हास्तरीय लेखी परीक्षेत प्रशालेची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. समीक्षा केसरकर हिने १०० पैकी 95 गुण प्राप्त करून, जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तसेच कु .किमया केसरकर 8 वी ,मृण्मय शिरोडकर 7 वी ,कु. समृद्धी मडगावकर 7 वी,  दुर्गाराम कुडतरकर 7 वी , ब्राह्मी निवेलकर 8 वी , स्वरा टिळवे 8 वी ,राधिका सोनारकर 8 वी, विभव राऊळ 8 वी व स्नेहल मटकर 8 वी या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला, व   नेत्रदीपक यश संपादित केले.
शिवचरित्र लेखी स्पर्धा परीक्षेसाठी प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम. श्रुती जोशी यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल सिं. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ शुभदादेवी भोसले विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोसले विश्वस्त युवराद्यनी श्रद्धाराजे भोसले व संस्थेचे सदस्य तसेच प्रशालेचा मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, पर्यवेशिका श्रीम. जान्हवी सावंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ मातापालक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा