You are currently viewing होळी

होळी

*ज्येष्ठ लेखक कवी संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*होळी*

 

आला सण रंगपंचमीचा

मिटला भेद जातीधर्माचा

 

निळा हिरवा पिवळा लाल

फुगे,पिचकारीची कमाल

 

रंगात रंगल्या नर नारी

उधळण गुलालाची भारी

 

ओले सुके नैसर्गिक रंग

होळीचा न्याराच मुक्त ढंग

 

जुन्या वस्तूंची होऊ द्या होळी

होलिकेला पुरणाची पोळी

 

-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

द्वारा डॉक्टर साई प्रसाद

अनिका पिकॅडिली

ए-५०३

पुनावळे बाजार, पुनावळे पुणे- ४११०३३

प्रतिक्रिया व्यक्त करा