You are currently viewing वृत्त : अनलज्वाला

वृत्त : अनलज्वाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम गजल*

 

वृत्त : अनलज्वाला 

 

कशी करावी कविता कोणी सांगा मजला

सुंदर माझी वही पाहुनी का हो हसला?

 

जमले सारे शब्द बापुडे, केली कविता

‘ फिदी, फिदी ‘चा शेरा त्यांचा मनास डसला

 

परभाषेचा खजिना थोडा जरा उचकला

चोरीचा तो उघड मामला सहजी पचला

 

समीक्षकांना प्रसन्न केले पान बिडीने

थोरपणाचा मंच मला तर नाही दिसला

 

पारितोषिके, चर्चा बिर्चा , जमले सारे

कवी व्हायचा केविलवाणा प्रयोग फसला

 

हौसेने मी प्रसिद्ध केली स्वतः पुस्तके

रद्दीचा तो ढीग घरातच सहजी रचला

 

कवितेसाठी करू लागते म्हणे साधना

मेहनतीचे डोंगर दिसता जीवच खचला.

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा