You are currently viewing वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान

 

यमुनानगर निगडी – यमुनानगर येथील जेष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नुकताच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.

नाना नानी पार्क येथे संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेत्या मा. सुलभा उबाळे होत्या. संघाचे अध्यक्ष श्री .गजानन ढमाले यांनी प्रस्ताविकात संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. सौ. मंगला पाटणकर, सौ. विनीता श्रीखंडे यांनी सत्कारार्थी महिलांचा परिचय सूत्रसंचालन करीत दिला.

सर्व महिला डॉक्टर सानिका गवस, प्राजक्ता निफाडकर, सुजाता जोशी भावे, अरूंधती करमाळकर, कुमुदिनी पाठारे, मीना दोशी, अश्विनी तापशाळकर, स्नेहल घोडे, प्रतिभा लबडे, चैत्राली इनामदार, शर्वरी यरगट्टीकर यांचा तसेच खोपोली नगरपालिका रूग्णालयात काम केलेल्या सेवानिवृत्त परिचारिका यांनी आदिवासी महिलांची निरपेक्ष सेवा केल्याबद्दल सौ.माधुरी डिसोजा कुमठेकर यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ कवी रमाकांत श्रीखंडे, बाबू डिसोजा यांची उपस्थिती श्रोत्यांमध्ये लक्षणीय होती. सर्वश्री मुजुमदार, गुंजाळ, चव्हाण या ज्येष्ठ सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा