You are currently viewing कामाचे योग्य नियोजन केले तर त्यात यश हे निश्चित आहे – अध्यक्ष डॉ. अरुण गोडकर

कामाचे योग्य नियोजन केले तर त्यात यश हे निश्चित आहे – अध्यक्ष डॉ. अरुण गोडकर

पणदूरतिठा महाविद्यालयात तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम

कुडाळ :

दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा मधील तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकादमीचे सचिव, मा. डॉ अरुण गोडकर, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिकेत वजराटकर (जनरल सर्जन कुडाळ) उपस्थित होते.

सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्मिता परब, संगणकशास्त्र विभागाचे प्रा. प्रथमेश गोसावी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतकर कर्मचारी, विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. द्वितीय वर्षातील विद्यार्थी कु. वेदांत कानसे याने विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा दिल्या. तसेच तृतीय वर्षातील विद्यार्थीनी कु. कांचन आगलावे, कु. अमिष बागवे, कु. डॅरेल म्यानयेकर यांनी महाविद्यालयाप्रती विचार व अनुभव मनोगतून व्यक्त केले.

प्रा. पूनम गावडे, प्रा. प्रांजना पारकर यांनी प्राध्यापक मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ वजराटकर यांनी आपल्या मनोगतातून “विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर अन्य कोणत्याही ठिकाणी न जाता आपल्या गावात, तालुक्यातच नोकरी, व्यवसाय करावा, जेणेकरून आपलं गाव, शहर समृद्ध होईल” असा मौलिक संदेश व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. अरुण गोडकर यांनी विद्यार्थ्यांनी कोणतेही काम करताना कामाचे योग्य ते नियोजन केले तरच आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्मिता परब. सूत्रसंचालन कु. मयुरी चिंदरकर, आभार कु तन्वी मेस्त्री हिने व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा