You are currently viewing पाट तिठा परीसरात सकाळी डंपरची धडक बसल्यामुळे शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच ठार…

पाट तिठा परीसरात सकाळी डंपरची धडक बसल्यामुळे शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच ठार…

पाट तिठा परीसरात सकाळी डंपरची धडक बसल्यामुळे शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच ठार…

कुडाळ
वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गाडीखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली. ही घटना आज सकाळी पाट तिठा परिसरात घडली. मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अभ्यास करण्यासाठी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना ही घटना घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी निवती पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा सुरू आहे. दरम्यान संबंधित डंपर चालकावर कारवाई करण्यात यावी या मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा