You are currently viewing बहरले मी बहरले….

बहरले मी बहरले….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बहरले मी बहरले….*

 

मी बहरले मी बहरले आम्रतरूसम राया

मोहरलेली तुम्ही बघा ना सुंदर माझी काया…

 

फुलपांखरासम मी वेडी

मी बागडते गगनात

तुम्ही उडा ना माझ्या संगे

स्वप्नांच्या दुनियी राया

मोहरलेली तुम्ही बघा ना सुंदर माझी काया..

 

स्वप्न पाहणे किती हो सोपे

लागत नाही दाम

ना तरी म्हणती ना हो सगळे,

पैशांतच नाही राम

कशास धावा पैशा मागे धावाधाव कराया

मोहरलेली तुम्ही बघा ना सुंदर माझी काया…

 

दुनियादारी फारच खोटी

असेच म्हणती सारे

बघता बघता निघून जाती

तरूणपणाचे वारे

नको पडाया भानगडीत त्या,नको करू या “जाया”….

मोहरलेली तुम्ही बघा ना सुंदर माझी काया..

रूपवती मी लाडाची हो, सुखद संसार कराया…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा