शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे संजू परब यांचे आवाहन
सावंतवाडी :
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवस सध्या सुरू असलेल्या मुंबई अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवस १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ३.३० वाजता सावंतवाडीत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती संजू परब यांनी दिली.
संजू परब मित्र मंडळ, सह्याद्री फाउंडेशन आणि शिवसेना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या विशेष सोहळ्याचे आयोजन हॉटेल मॅंगो हॉटेलच्या भव्य बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आले आहे या सोहळ्यास निलेश राणे स्वतः उपस्थित राहून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने संजू परब मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच निलेशजी राणे साहेबांचे असंख्य अनुयायी आणि हितचिंतकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

