You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला फूड फेस्टिवल मध्ये खरी कमाईचा अनुभव

बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला फूड फेस्टिवल मध्ये खरी कमाईचा अनुभव

*बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला फूड फेस्टिवल मध्ये खरी कमाईचा अनुभव*.

*बांदा*

बांदा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या फूड फेस्टिवल मध्ये पीएम श्री जिल्हा परिषद बांदा केंद्र शाळेतील स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध खाद्यपदार्थाची विक्री करून खरी कमाईचा आनंद‌ घेतला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बांदा येथील प्रेरणा महिला मंडळाच्या वतीने दोन दिवसीय फूड फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनाही खरी कमाईचा अनुभव यावा यासाठी स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवून त्याची विक्री करून या फूट फेस्टिवल मध्ये स्वकमाईचा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे स्काऊटर‌ शिक्षक श्री जे.डी.पाटील, मुख्याध्यापक शांताराम असनकर व सर्व शिक्षक वर्गाचे मार्गदर्श मिळाले‌.विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाबद्दल प्रेरणा महिला मंडळ तसेच सरपंच अपेक्षा नाईक ,माजी जिल्हा परिषद सदस्या श्वैता कोरगावकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा