*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वसंत ऋतू*
आला वसंत साजरा
हिरवीगार वसुंधरा
पाने फुले सजलेली
फुलला शुभ्र मोगरा
शालू नेसली हिरवी
वसुंधरा नटलेली
जणु नवरी नटते
मनातच लाजलेली
वसंत ऋतूची चाहूल
फुला फुलांतून सुगंधली
पर्ण फुलांचा सांभार
हिरवी धरा ही बहरली
मोगरा ,निशिगंध दरवळला
जाईजुईचा पडे पसारा
गुलमोहोर लालेलाल
रातराणीचा सुगंध सारा
गुलबक्षीचा झुलता झुला
गणेश वेली पहुडल्या
अबोल त्या कुंद कळ्या
कमानीवरती लाजल्या
कपारीतून डोंगराच्या
सदाफुली डोकावली
पाहून रानं अबोली
हळुच कशी लाजली
*शीला पाटील नाशिक.*