You are currently viewing कणकवलीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवजयंतीचे १७ मार्चला आयोजन

कणकवलीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवजयंतीचे १७ मार्चला आयोजन

कणकवलीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवजयंतीचे १७ मार्चला आयोजन

कणकवली

कणकवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कणकवली तालुका यांच्यावतीने तिथीप्रमाणे १७ मार्च रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ति विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी १० वाजता शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना, त्यानंतर शिवरायांवर आधारित वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन खेळ यांचे प्रात्याशिक व शोभायात्रा काढली जाणार आहे. वेशभूषा स्पर्धेसाठी अनुक्रमे ५,०००, ४,०००, ३,००० व उत्तेजनार्थ प्रथम १००० द्वितीय १०००अशी बक्षीसे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तेजस राणे, धीरज मेस्त्री, उद्धव पारकर यांच्याशी संपर्क साधावा. शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना शिवप्रेमींनी उपस्थित रहावे,असे आवाहन रुपेश नार्वेकर व तेजस राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा