*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे सन्माननीय सदस्य कवी शाहीर मनोहर पवार केळवदकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*होळीचे रंग*
वसंताची लागता चाहूल
पळस हा फुलला
सुगंधाने राणाला
पडली पहा भूल
रंग पंचमी खेळ
असा रंगला मनी
कुणी फेकती रंग
रंगात न्हाती कुणी
लाकडे पेटती होळीत
नैवद पुरणपोळी
बामण मेला संध्याकाळी कुणी देती हाळी
रंगात रंगले तरुण
भांगात झिंगले कैक
प्रत्येकाला चढला रंग
साद वेगळी एैक
पिचकारी रंगाची
पळती घेवून मुले
कुणी भेदरले कुणी
घरातच पहा लपले
होळीचा उत्सव आनंदाने करा साजरा
लाज सोडून खेळा रंग
धुंद व्हा तुम्ही जरा
……………
मनोहर पवार केळवदकर .
9850812651.