*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🔥🔥या होळीने🔥🔥*
अशुद्धतेचे गगन ग्रासले या होळीने
ओझोनला ही प्राकृत केले या होळीने ।।
तनामनातील दुष्ट जीव हे नष्टच केले
आसमंत हा शुद्धच केला या होळीने ।।
समिधा करते कृतकर्माला सज्जनशक्ती
आनंदाचे उधाण आणले या होळीने ।।
पुन्हा कराया पाप मोकळी दुष्ट माणसे
वर्षभराचे पाप जाळले या होळीने ।।
मनी रुजविते मूल्य भक्तिचे तेजोराशी
चराचराचे नभ आक्रमिले या होळीने ।।
सद्गुणवर्धक दुर्गुणनाशक हवन टाकता
पंचमीचे मनी सुख रंगविले या होळीने ।।
या होळीची राख कपाळी जरा लावता
“बुद्धीपूजन” कृतार्थ मानव या होळीने ।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख
नाशिक ९८२३२१९५५०