*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आनंदाची झोळी*
धगधगे अग्निशिखा
तम सरे क्षणी दूर
दुर्गुणांची होळी करू
अन्यायाचा करू धूर…..१
काम क्रोध भष्टाचार
नितीमत्ता हरविता
उरे नच चाड मनी
पापकर्म करविता…..२
फुका हेवेदावे निंदा
मनी नको तिरस्कार
लोभ मोह माया सोडी
चला जाळू अहंकार …..३
क्लेश नैराश्य हनन
करू संस्कृती जतन
सुस्ती आळस दहन
दुष्ट प्रवृत्ती पतन…..४
मास फाल्गुन पौर्णिमा
शेवटचा सण होळी
सान थोर मिळुनिया
भरु आनंदाची झोळी…..५
*©️®️डॉ.सौ. मानसी पाटील*
मुंबई