You are currently viewing ओरोस महामार्ग येथे अनधिकृत बांधलेला कोकण गादी कारखाना प्रशासनाने पाडला

ओरोस महामार्ग येथे अनधिकृत बांधलेला कोकण गादी कारखाना प्रशासनाने पाडला

महामार्ग प्राधिकरणाची कारवाई

ओरोस :

ओरोस येथे मुंबई गोवा महामार्ग लगत वाहतुकीस अडथळा ठरणारा व धोकादायक असलेला अब्दुल हमीद सुबराणी यांच्या मालकीचा गादी कारखाना व फर्निचरचे दुकान गुरुवारी जमीन दोस्त करण्यात आले. ही कारवाई महामार्ग प्राधिकरणाने ने पोलीस बंदोबस्तात केली. महामार्गावरील धोकादायक वळणावर अनधिकृत असलेल्या या अवाढव्य बांधकामावर अखेर हातोडा पडला.

मुंबई गोवा महामार्गालगत ओरोस बुद्रुक सर्वे नंबर ३७ हिस्सा नंबर ३३ या क्षेत्रामध्ये सुबरानी यांनी बेकायदेशीर बांधकाम केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गादी कारखाना व फर्निचर व्यवसाय सुरू होता. फर्निचरसाठी व गादी कारखान्यात येणाऱ्या ग्राहकांमुळे व थेट महामार्गावरच वाहन पार्किंग होत असल्यामुळे अनेक अपघात घडले होते. वळणावरील हे क्षेत्र त्यामुळे धोकादायक बनले होते. वारंवार नोटिस देऊनही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती. याबाबतची तक्रार महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार यांच्याकडे झाली होती.

दरम्यान गुरुवारी पोलीस बंदोबस्तात ही बेकायदेशी बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारखान्यात असलेले फर्निचर व गाद्या कारवाईपूर्वी बाहेर काढून बेकायदेशीर इमारत तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. यावेळी महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा