You are currently viewing स्वातंत्र्याचा धगधगता ज्वालामुखी- नेताजी सुभाषचंद्र बोस – प्रा.एस.एन.पाटील.

स्वातंत्र्याचा धगधगता ज्वालामुखी- नेताजी सुभाषचंद्र बोस – प्रा.एस.एन.पाटील.

वैभववाडी

आधुनिक भारताच्या स्वातंत्र्याचा धगधगता ज्वालामुखी आणि आझाद हिंद सेनेची उभारली करून ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करुन सोडणारे स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस होत. क्रांतिकारी विचारांवर श्रध्दा ठेवून परकीय देशांच्या सहाय्याने व हिंदी सेनेच्या सामर्थ्यावर ब्रिटिश सत्ता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु स्वातंत्र्यापूर्वीच विमान अपघातात मृत होऊन अजरामर झालेले एक थोर राष्ट्रभक्त म्हणजे सुभाषचंद्र बोस होय असे प्रतिपादन प्रा.एस.एन.पाटील यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचालित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ जानेवारी सुभाषचंद्र बोस जयंती कार्यक्रम (पराक्रम दिवस) प्राचार्य डाॕ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस एन पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. यावेळी उपप्राचार्य प्रा.ए.एम. कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॕ.दर्शना कोरगावकर, प्रा.आर.बी. पाटील, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांचे व्यक्तिमत्व आदर्शवत आणि प्रेरणादायी असे होते.
त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण तसेच मार्गदर्शक आहे.
स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा स्वीकार करावा असे आवाहन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन भास्कर यांनी केले तर स्वयंसेवक अतिश माईणकर यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा