You are currently viewing आम. निलेश राणेंच्या प्रयत्नांतून धुरीवाडा रस्त्याच्या कामासाठी ३३ लाखाचा निधी मंजूर

आम. निलेश राणेंच्या प्रयत्नांतून धुरीवाडा रस्त्याच्या कामासाठी ३३ लाखाचा निधी मंजूर

मालवण :

आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मालवण कोळंब रस्ता ते हॉटेल दर्यासारंगकडे जाणारा रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामाजिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक तुळशीदास गोवेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

मालवण शहर धुरीवाडा येथील या कामासाठी सुमारे ३३ लाख निधी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. त्याबद्दल श्रीकृष्ण मंदिर मित्र मंडळ व धुरीवाडा ग्रामस्थ यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. दरम्यान डांबरीकरण काम होत असताना नगरपरिषद बांधकाम प्रशासनाने ते दर्जेदार करून घ्यावे. याठिकाणी गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते याचा विचार करता रस्ता अधिक मजबुतीसाठी डांबर प्रमाण अधिक वापर व्हावा. त्याबाबतही अभियंत्यांनी लक्ष द्यावे अशा सूचना दत्ता सामंत यांनी दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वराडकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रीतम गावडे, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, आशा वळपी, अंजना सामंत, राणी पराडकर लुडडीन फर्नांडिस, क्रांती धुरी, मधुरा तुळसकर, राजू बिडये, पराग खोत, तोडणकर, बाबू धुरी वसंत गावकर, आबा शिर्सेकर, सचिन गोवेकर, ताता मसुरकर, नागेश मसुरकर, विशाल गोवेकर, चेतक पराडकर, दत्ता केळुसकर, एकनाथ मोहिते, विनायक सारंग, विलास जोशी, तातू शिर्सेकर, दीपक धुरी, शिवाजी केळुसकर, लीलाधर सावबा, गणपत आडीवरेकर, संदेश राहुल, गजानन पराडकर, विजय केळुसकर, विजय खडपकर, तातू खोर्जे, सतीश धुरी दादू शिर्सेकर, आनंद जामसांडेकर भाऊ मोरजे, राज मयेकर, गणेश परब आणि धुरीवाडा ग्रामस्थ महिला पदाधिकारी व शिवसेना भाजपा महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.‌

महायुती सरकार हे जनतेचे सरकार आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य करणे याला प्राधान्य आहे. जिल्ह्यातही खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात गतिमान विकास होत असून विकासाची गती अशीच कायम राहील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा