*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तो — जीवनाधार!*
‘तो ‘ तिच्या आयुष्यात
येतो जन्मदाता बनून
लाडकी बेटी त्याची
माया करतो भरभरून
‘तो तिच्या आयुष्यांत
होऊन येतो दादा प्रेमळ
हक्कही गाजवी,खोड्या करी
पण असतो, मात्र मनी निर्मळ
कधी पुढचा कधी पाठचा
भाऊ’ सदैव प्रिय ‘ बहिणीला
लहानग्याचे ताई ..ताई
मनास भावते, हो दिदीला
मित्र नावाचा खास एक
असावा”” तो”” जीवनी
सांगण्यास गूज विश्वासाने
एकमात्र तोच “मनोमनी”
येतो एक झंझावात
प्रियकर रूपे तारूण्यात
प्रियराधन करता त्याने
गोड शिरशिरी तनमनांत
पती रूपाने येतो “तो”
सखा सर्वस्व होई, स्त्रीचा
तनमनाने एकरूप उभयता
आनंद आधार हो जीवनीचा
पुत्र रूपाने येई “तो”
मातृत्वाचे मिळते दान
वात्सल्याचा फुटतो पान्हा
होई”तो”स्त्रीचे आनंद निधान
आजची स्त्री सर्वार्थाने जरी स्वतंत्र
“त्याच्या” वाचून जीवन अपूर्ण
एकमेका पूरक व्हावे संसारी
स्त्रीजीवन होई सुफळ संपूर्ण .
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

