You are currently viewing सावंतवाडी कारागृहातील बंदींना मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण…

सावंतवाडी कारागृहातील बंदींना मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण…

सावंतवाडी कारागृहातील बंदींना मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण…

सावंतवाडी

जिल्हा कारागृहांमध्ये आर सिटी कुडाळ व बँक ऑफ इंडिया कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील १४ बंदींना मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अप्पर पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुपेकर व कारागृह महानिरीक्षक दक्षिण विभाग श्री. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर श्री. मेश्राम, आर सिटी कार्यालयाचे किशोर राठी यांच्या सहकार्याने मेणबत्ती व अगरबत्ती प्रशिक्षण यशस्वीरित्या राबवणे शक्य झाले आहे.

ह्या प्रशिक्षणासाठी कारागृह अधीक्षक सतीश कांबळे , वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे व तुरुंगाधिकारी संजय मयेकर यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा