झोळंबेत पशुपालक शेतकरी मित्रांसाठी ११ मार्च रोजी मार्गदर्शन शिबीर
दोडामार्ग
झोळंबे परिसरातील सर्व पशुपालक शेतकरी मित्रांसाठी सुवर्णसंधी लाभलेली आहे. मंगळवार दि. ११ मार्च रोजी स. १० वा. ग्रामपंचायत झोळंबेच्या सभागृहात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हास्तरीय अधिकारी शासनाच्या वेगवेगळ्या योजना, लाभार्थी निवड तसेच पशुंच्या आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी आदीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तरी पशुपालक शेतकरी बांधवांनी वेळेत उपस्थित राहुन सहकार्य करावे…

