कुडाळ :
कुडाळ बाजारपेठेतील श्री देव मारुती मंदिराचा ३९ वा वर्धापन दिन सोहळा आज ८ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे महाराज यांचे कीर्तन होत आहे. शुक्रवारपासून या कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली. ८ मार्च रोजी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सायंकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत ‘रामराज्य’ या कथेवर आफळे महाराज यांचे कीर्तन सादर होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान समिती अध्यक्ष व कार्यकारिणीने केले आहे.

