*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्त्रीत्व*
स्त्री जी जाणून आहे आपले स्त्रीत्व
तिला सामावून घ्याल कधी जीवनात
कधी सोडून द्याल,वाटते निराधार
पण हसत निरोप देत,हसेल तुम्हावर मनात —
उभी ताठ,नाचावे जगाने तिच्या पायाशी
चेहर्यावर सदा उगवतीची चमक
बाईस आदर देण्याचे हवे धाडसच
तिच्यात वादळांशी लढायची धमक —
आनंदाने जगतांना जाणते अंतीमसत्य
जागरुक आपल्या अधिकारासाठी
तिचा नसे एक रंग,ती तर इंद्रधनुष्य
स्नेह देते-घेते,निवडते मार्ग स्वतःसाठी —
कालपरत्वे जाणवते स्पष्ट वृद्धावस्था
उपेक्षित-जिवट त्यावरही उगवते हिरवळ
देत नवजीवनाधार-संगोपन व्यवस्था
अवशेषी खोडातून येईल चंदनी दरवळ —
विजया केळकर______
नागपूर
८/३/२०२५
(जागतिक महिला दिन)

