*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तिच्या कार्याचे गणित*
कितीतरी अशा महिला
सुटत नाही कार्याचे गणित
समाजास्तव झटल्या
उपकार त्यांचे अगणित…
राक्षसी प्रवृत्तीचा
देवीच बिमोड करते
देवांना ही देवींची
आराधना करावी लागते..
अहिल्या, लक्ष्मी,दुर्गावती
देशरक्षण प्रतिकूल परिस्थितीत
बुध्दी, विवेक, संयमाने
केले सुराज्य व्यवस्थित…
सावित्रीआईने लेखणी दिली
शिक्षित,साक्षर मुलींना केले
विरोधकांचे प्रहार सोसत
अन्यायाचे खंडन केले…
आज आधुनिक स्री घडली
त्यांच्या कार्याचं नाही गणित
उज्ज्वल केले त्यांनी भविष्य
महिला दिनी स्मरण खचित…!!
अरुणा दुद्दलवार@ ✍️