स्वप्निल चंद्रकांत धुरी यांचा युवासेना जिल्हा चिटणीसपदासह पक्षसदस्यत्वाचा राजीनामा
कणकवली
श्री स्वप्निल चंद्रकांत धुरी, युवासेना (उबाठा) जिल्हा चिटणीस शिवसेना (उबाठा) या पक्षामध्ये गेली १० वर्षे कार्य करीत असून मागील लोकसभा व विधानसभा या निवडणुकींच्या पक्षाचा झालेल्या पराभवानंतर पक्षाला आलेली मरगळ झटकण्यास अथवा दुर करण्यास पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी यांच्या सह सर्वच पदाधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकारी हे पूर्णतः संभ्रमावस्थेत वावरत आहेत. या सगळ्याबद्दल वेळोवेळी वरीष्ठ पदाधिकारी वर्गा बरोबर चर्चा करून देखील त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका वा कार्यकर्त्यांची दखल वरीष्ठ पातळीवरून घेतली जात नाहीय.
त्यामुळे या सर्व नैराश्यातून मी माझ्या वरील सर्व जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पक्षाने माझ्यावर वेळोवेळी ज्या जबाबदा-या/पदे देऊन जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी मा.श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व श्री आदित्यसाहेब ठाकरे, तसेच जिल्हातील पक्षाचे मा.वरीष्ठ पदाधिकारी यांचा आभारी आहे. तसेच एवढे दिवस काम करीत असताना माझ्या कडून हस्तेपरहस्ते जर कुणाची मने दुखावली गेली असतील तर मी त्यांची दिलगीरी व्यक्त करतो. तरी मी पक्षाच्या युवासेना जिल्हा चिटणीसपदासह पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे निवेदन स्वप्निल धुरी यांनी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर तसेच सुशांतजी नाईक, युवासेना (उबाठा) जिल्हा प्रमुख सिंधुदुर्ग, यांना सादर केले आहे.