You are currently viewing शिवसेना खानयाळे गावाच्या बाजूनेच – गणेशप्रसाद गवस

शिवसेना खानयाळे गावाच्या बाजूनेच – गणेशप्रसाद गवस

*शिवसेना खानयाळे गावाच्या बाजूनेच – गणेशप्रसाद गवस*

*क्वारी कोणाच्याही असोत गावंच स्वास्थ महत्वाचे*

दोडामार्ग –
खानयाळे येथील ग्रामस्थांचे क्वारी विरोधात जे आंदोलन सुरु आहे. त्याला दोडामार्ग शिवसेनेचा पूर्णतः पाठींबा आहे अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिली.
श्री. गवस म्हणाले, खानयाळे येथील ग्रामस्थांनी प्रदूषण आणि अन्य विषय घेऊन क्वारी विरोधात जे आंदोलन उभे केले ते योग्य आहे. क्वारी चालक – मालक ओळखीचे असोत किंवा कोणत्या पक्षाचे आहेत हे दुय्यम आहे आज घडीला जर एखाद्या गावचे सामाजिक स्वास्थ बिघडत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तिलारी धरण धोक्यावरही ग्रामस्थ बोलत आहेत हे ही भयावह आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे.

फोटो – गणेशप्रसाद गवस

प्रतिक्रिया व्यक्त करा