*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*निर्मोही संस्कार*
**************
*मी तर म्हणतो सात्विक , नैतिक विचारांना कशाला हवीत बंधने..?*
*अगदी मुक्तमोकळं कुणालाही न दुखवता जीवनात व्यक्त होत जगत रहावं..!* *हा निर्मोही संस्कार आहे तिथेच तर देवत्व , संतत्व प्रत्ययास येत असते.*
*कुणालाही न दुखवता कधी प्रत्येकाच्या मनात राहण्याचा शाश्वत विचार करावा हेच सत्कर्म आहे. हेच खरे संचित आहे.*
पण आपलं जीवन जगताना , आपले छंद जपताना आपण आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहून हवं तसं जगत रहावे. नातीही जपत रहावित.
सत्कर्माची कास धरून जीवन अंगीकारताना विवेकाचे भान ठेवून स्वानंदे जगावे.
*कुणाला आवडो अथवा ना आवडो..!*
” *कुठल्याही बंधनात न अडकता*
मुक्त जगावं , मुक्त रहावं , मुक्त फिरावं , मुक्त हवे ते खावं . मुक्त लिहावं.. मुक्त गाणं गावं ,मुक्त गुणगुणावं. प्रत्येक क्षणी तृप्त आणि मुक्त निर्मळ आनंदात ” *हरफन मौला सारखे जगत रहावं..!!!*
*जे जे चांगले ते स्वीकारत रहावं*
*आणी हे असं जगणं फक्त निष्काम , निर्मळ, प्रामाणिक व्यक्तिमत्वाला साध्य होते. हे दृष्टांती वास्तव आहे.*
*जन्म मृत्यू हा एक सुंदर प्रवास आहे तो प्रत्येक जीवाला करावाच लागतो*
प्रत्येक धर्मातील संस्कार आणि शिकवण ही मानव कल्याणकारी आहे हे आपणच जाणले पाहिजे. त्या अनामिक , अदृश्य ,अगाध शक्तीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. प्रारब्ध , कर्म , कर्मभोग हे अटळ आहेत. या बाबतीतचे अनेक दृष्टांत हे सर्व प्राचीन धर्मग्रंथातुन आढळतात. त्याचे चिंतन , मनन , वाचन , पठण जर केले तर जीवनाची अर्थपूर्ण सत्यता जाणवल्या शिवाय रहात नाही. म्हणून जीवनाकडे अंतर्मुख होवून आपली वाटचाल करावी हेच आपल्या हाती असते.
*मृत्यू हे जीवनातील अत्यन्त सुंदर सत्य आहे त्याची चिंता कशाला करायची . तो तर अटळ आहे*
मी तर म्हणतो ….
*माणसानं माणूस म्हणून जगावं , अपपर भाव त्यजावा , कुत्सित प्रवृत्ती त्यजावी आणि मनी परस्पर निःस्वार्थी प्रीतभाव जपावा. म्हणजे जीवनाच्या सत्यफलश्रुतीची सुखद अनुभूती येते आणि जन्म कृतार्थ होतो.*
” *म्हणूनच सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेड रुविणारे जगतगुरु संत तुकाराम म्हणतात* …
*ठेविले अनंते तैसेची रहावे ।। चित्ती असु द्यावे समाधान।।*
*तर ज्ञानेश्वरी माऊली यांनी आपल्या अध्यात्मिक आणि तत्वज्ञान विषयक आपले विचार व्यक्त करताना……*
*जगत कल्याणासाठी पसायदानात सर्व सृष्टीसाठी भगवंता जवळ प्रार्थना अत्यन्त श्रवणीय प्रार्थना केली आहे..*
” *दुरितांचे तिमिर जावो ।* *विश्व स्वधर्म सुर्ये पाहो.।*
” *जो जे वांछिल ते ते लाहो प्राणिजात* ।।
*हा जीवनाचा सात्विक सारांश आहे.*
*जीवन क्षणभंगुर आहे* याची जाणीव असावी.
*उपकार कर्त्याच्या ऋणात रहावं.*
*जन्मदात्यांचे कधी विस्मरण होणार नाही याची दक्षता घ्यावी.*
” *येवो मृत्यू .. मी तर कुणाच्या ऋणात न रहाणारा मुक्तमस्त कलंदर..!! तुझी दोन्ही बाहू पसरून वाट पहातो आहे. अशी मनाची धारणा असावी.*
” *तो पर्यंत कुठल्याही अविवेकी बंधनात न रहाता स्वतःची अस्मिता सांभाळत आनंद देत आणि घेत जगावं हीच ईच्छा बाळगावी.* ”
*आणि अंतिम सत्य असलेल्या त्या कृपावंताला स्मरत रहावं हेच आपल्या हाती असतं..!!!*
*इति लेखन सीमा*
🙏✡️🕉️✡️🙏
*©️वि.ग.सातपुते (विगसा)*
*( 9766544908 )*
🙏