*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महिला दिन*
स्त्रित्वामुळे आयुष्यात
घडी जीवनात बसते
तिच्या असण्याने घरी
लक्ष्मी देव्हारी बसते
घरी दारी गोतावळा
नाते प्रेमाचे जपते
आली वेळ लेकरावर
जीव पणाला लावते
दोन कुळांचा उध्दार
स्त्रीची कुस उजळते
वेल मायेची मंडपी
संस्काराची चढवते
कधी होऊन रणरागिणी
अन्यायाची वाताहात
कधी वात्सल्याची मुर्ती
जणु नंदादिपाची वात
संस्काराचं विद्यापीठ ती
अनंत काळची माता
स्वामी तिन्ही जगाचा तो
टेकवी तिजपुढे माथा
*शीला पाटील. चांदवड.*

