*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तप्त उन्हाळा*
तप्त उन्हाळा
रणरणतं ऊन
निघे भाजून……
निथळे घाम
असा तप्त उन्हाळा
असह्य झळा…..
तहानलेली
रानी गुरे वासरे
आटले झरे…..
तप्त उन्हाळा
बहरतो बहावा
सोनपिवळा…..
पळस फुले
होरपळ झेलती
मस्त डुलती……
पाखर चोच
तृषार्त जलाविना
थेंब दिसेना……..
तप्त उन्हाने
जमीन भेगाळली
होते काहिली…..
नवी पालवी
करपत चालली
वेल झुरली…..।।
०००००००००००🍂🍂🍁
अरुणा दुद्दलवार@✍️