*मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन*
मालवण :
भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे संतापजनक वक्तव्य केले.त्यांनी आपल्या वक्तव्यातून मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. भाजप पक्षाची हीच विचारधारा असल्याने त्याच्या निषेधार्थ आज मालवणमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने. आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
भैय्याजी जोशी यांचा निषेध असो! मुंबई मराठी माणसांची, नाही कोणाच्या बापाची! आवाज कुणाचा शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, माजी नगरसेवक नितीन वाळके,पराग नार्वेकर, गणेश कुडाळकर,मंगेश टेमकर, बाबा सावंत,महेश जावकर, प्रशांत सावंत, बाबा पास्कोल,विनोद सांडव,उमेश मांजरेकर,भाऊ चव्हाण,महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूनम चव्हाण, तालुकाप्रमुख दीपा शिंदे, युवतीसेना तालुकाप्रमुख नीनाक्षी शिंदे, विभागप्रमुख बंडु चव्हाण,राजेश गावकर,समीर लब्दे, प्रवीण लुडबे, रुपेश वर्दम, नारायण कुबल,बाळ महाभोज,दाजी चव्हाण, पप्पू परुळेकर,नंदू गवंडी, प्रेमदत्त नाडकर्णी, रवी तळाशीलकर,राजू मेस्त्री,उमेश प्रभू,बाबू टेंबुलकर, शिवा भोजने,वंदेश ढोलम,बंड्या सरमळकर,गौरव वेर्लेकर,सचिन रेडकर, भारती आडकर,रूपा कुडाळकर,आर्या गावकर,विद्या फर्नांडिस,आरती नाईक,दिव्या धुरी, भाग्यश्री खान, जयू लुडबे,संतोष आंग्रे,अमोल वस्त, श्रद्धा वेंगुर्लेकर,नरेश हुले,मयूर करंगुटकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.