You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८८ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८८ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते । जय गजानन- श्री गजानन ।।

__________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८८ वे

अध्याय – १५ वा , कविता – ४ थी

___________________________

 

श्री गजानन विजय ग्रंथ नित्य वाचावा । स्वामी गजनानांचा संदेश घ्यावा । तो ध्यानात ठेवावा । आचरणासाठी ।। १ ।।

 

अध्याय पंधराव्यात । लोकमान्य सभा झाली अकोल्यात ।

त्याचा वृत्तांत । कथिला आहे श्रीदासगणूनी ।।२ ।।

 

टिळकांचे जाज्वल्य उद्गार । तो स्वराज्याचा हुंकार । देशभक्तीचा आविष्कार । सभेत ऐकीला जनतेने ।। ३ ।।

 

सभेमाजी टिळक झाले व्यक्त । शब्द त्यांचे ऐकुनी

स्वामी होती संचित । म्हणाले त्वरित । सरकार करिन

शिक्षा आता टिळकांना ।। ४ ।।

 

स्वामींचे वचन खरे झाले । फर्मान सरकारी सुटले ।

टिळकांना दोषी ठरवले । सुनावली शिक्षा तुरुंगवासाची ।। ५।।

 

स्वामी कोल्हटकरास म्हणती । हा प्रसाद भाकरीचा आहे टिळकांप्रति । या प्रसादाच्या बळावरती । होईल कामगिरी मोठी टिळकांच्या हातून ।। ६ ।।

***************

क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास

__________________________

 

कवी अरुणदास-

अरुण वि.देशपांडे- पुणे

__________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा