You are currently viewing पडेल येथे महिला दिनाचे औचित्य साधून ७ व ८ मार्चला विविध कार्यक्रम….

पडेल येथे महिला दिनाचे औचित्य साधून ७ व ८ मार्चला विविध कार्यक्रम….

पडेल येथे महिला दिनाचे औचित्य साधून ७ व ८ मार्चला विविध कार्यक्रम….

देवगड

पडेल सरपंच भुषण पोकळे यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचे औचित्य साधून ७ व ८ मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव व मंडळ अधिकारी रेश्मा कडुलकर यांची उपस्थिती लाभणार आहे. यानिमित्त ७ मार्चला सायं. ४ वा. होम मिनिस्टर, व रात्री ९.०० पालकमंत्री नितेश राणे व पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर यांच्या माध्यमातून भव्य एल.ई.डी स्क्रीन वर छावा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. तसेच ८ मार्चला सकाळी ८ ते ९ शालेय निबंध स्पर्धा, ४ ते ७ रस्सीखेच व खो खो स्पर्धा व सकाळी १०.३० वा. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, ५ ते ७.३० खाऊ गल्ली कार्यक्रम, रात्रौ ८ वा. बक्षिस वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत.

तरीही जास्तीत-जास्त महिलांनी सहभागी ह्यावे, असे आवाहन पडेल सरपंच भुषण पोकळे, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर व ग्रामपंचायत अधिकारी शमशुद्दीन साटविलकर व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा