You are currently viewing सोडून चड्डी पळती वेडी

सोडून चड्डी पळती वेडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सोडून चड्डी पळती वेडी*

…………………….

तुझ्या जाईला बहर

अंगण माझे रीकामे

नाही झेपत सारवणे

नाही होत अती कामे

 

थकले आता शरीर

वाकडा झाला कणा

निवळून गेला ताठा

रागही झाला शहाणा

 

बकुळ टपकते दारी

केवडा फुलतो वईवर

दिसतो लई देखणा

नाग नांदती डोईवर

 

बाळ कयर्यांना मोहून

उडाणटप्पू मारती दगड

कौले फुटून पडतात खाली

खाप-या होती *रग्गड*

 

बघून पोवळे मध माशांचे

वात्रट पोरे मारती दगडी

तुटून पडती माशा त्यांवर

सोडून चड्डी पळती वेडी

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा