कणकवली ते नरवडे फोंडा नागवे करंजेपर्यंत
एस टी गाड्या रेल्वे स्टेशन च्या आत पीक अप शेड कडे थांबविणे संदर्भात सुरेश सावंत यांचे निवेदन सादर
कणकवली
कणकवली ते नरडवे फोंडा नागवे करंजे पर्यंत जाणारा सर्व एस टी गाड्या रेल्वे स्टेशन च्या आत पीक अप शेड कडे थांबवून जाणे साठी विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना आदेश होणे संदर्भात सुरेश सावंत यांनी खासदार नारायण राणे यांना विनंती केली आहे
मुंबई व अन्य भागातून जे कणकवली रेल्वे स्टेशन प्रवासी उतरतात यांना ग्रामीण भागात जाण्या करीता एस टी बस ची नितांत गरज असल्याने रेल्वे स्टेशन च्या बाहेर जी पीक अप शेड आहे ती लांब पडते कारण येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाकडे सामान असल्यामुळे त्यांना त्रास होत असतो आणि त्यात अंध अपंग आणि जेष्ठ नागरिक सुद्धा प्रवास करत असताना त्यांना जर रेल्वे स्टेशन जवळ एस टी मधुन सोडले तर मुंबई वरून पाचशे रुपये देऊन आलेल्या प्रवाशांना स्टेशन वरून घरी जाण्यासाठी एक हजार रुपये खर्च करावे लागणार नाहीत.
तरी मेहरबानी करून सर्व एस टी बसेस येते वेळी आणि जाते वेळी रेल्वे स्टेशन परिसरात नेण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदनाद्वारे सुरेश महादेव सावंत अध्यक्ष रेलवे प्रवासी संघटना यांनी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायणराव राणे यांना विनंती केली आहे.
