*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम सहाक्षरी रचना*
*मन*
असे कसे आहे
मन वेगवान
वा-याच्याही पुढे
धावते जोमानं….
भुईवर कधी
नभी झेपावते
चांदणफुलांना
वेचून आणते….
मनाचा गहिरा
अथांग सागर
सापडेना तळ
जाता खोलवर…
मन कल्पनांच्या
पंखांनी उडते
शब्द भरारीने
काव्य सजवते…
मन संवेदना
जाणते भावना
मन कनवाळू
पुसतं अश्रूंना…
मन असे सुक्ष्म
मन हे विराट
मनाचे अस्तित्व
मनाला माहीत…!!
•••~~~•••~~~•••~~~•••~~
अरुणा दुद्दलवार @✍️
दिग्रस यवतमाळ