*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सालंकृत मराठी…*
माझी ग माय मराठी,
दिसे कशी सालंकृत !
भाळी शोभतसे तिच्या,
लाल कुंकुम तिलक !…१
आहे जरी राज्यभाषा,
तिचा खानदानी बाज!
शब्दांची असे ती खाण,
चाले मनावर राज. !…२
ज्ञानदेवांनी पूजिली,
महाराष्ट्राची देवता!
मन भारावून जाई,
तिला वंदन करता!…३
काना, मात्रा अन् वेलांटी,
देवनागरी लिपीत !
उकार, ओंकार त्याचे,
करी अर्थ ते ध्वनीत !..४
एक टिंब जरी हले,
वाक्याचा बदले अर्थ!
अशी किमया भाषेची,
थोरपण करी सार्थ!….५
अभिजात दर्जा प्राप्त,
मिळाले मानाचे पान!
तिच्या योग्यतेचे लाभे,
मराठीत उच्च स्थान!..६
उज्वला सहस्रबुद्धे
