चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभाग नवीन खाते उघडण्यात प्रथम
देवगड
चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभागाने देवगड, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांत गावा-गावात डाक मेळावे आयोजित करून बचत खाती उघडण्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच, गोवा रिजनमध्ये द्वितीय क्रमांकावर हा उपविभाग पोहोचला आहे.
“लाडकी बहीण योजना” अंतर्गत उपविभागातील 89 पोस्ट ऑफिसमधून 8,000 पेक्षा जास्त महिलांची शून्य रुपयात बचत खाती उघडण्यात आली आहेत. प्रत्येक गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध असल्याने महिलांना योजनेचा लाभ थेट घरबसल्या मिळू लागला आहे.
“लक्ष्य की और” मोहिमेत देवगड उपविभागाने 4,000 पेक्षा जास्त खाती उघडून जिल्ह्यात प्रथम क्रमांक, तसेच गोवा पोस्टल रिजनमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
डाक निरीक्षक श्री. श्रीराम वायाळ यांनी महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शून्य रुपयाने बचत खाती उघडण्याचे आवाहन केले आहे.
देवगड पोस्टल उपविभागाचा हा उल्लेखनीय कार्यभार कौतुकास्पद आहे.