पाणलोट अंतर्गत कोकिसरे येथे रथयात्रेचे आयोजन…
वैभववाडी
आज पाणलोट अंतर्गत रथयात्रेचे आयोजन मौजे कोकिसरे महालक्ष्मी मंदिर येथे करण्यात आले. सदर रथयात्रेदरम्यान कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागताने करण्यात आली. सदर कार्यक्रमादरम्यान पाणलोट अंतर्गत मौजे को किसरे नाधवडे व नापणे या गावातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यामध्ये चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेची विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच पाणलोट अंतर्गत गावामध्ये काम करणाऱ्या उमेद अंतर्गत सीआरपी. इतर पाणलोट अंतर्गत सर्व माजी सरपंच यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर रथयात्रेचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे. कोकीसरे गावचे सरपंच प्रदीप नारकर. उपसरपंच समीक्षा पाटणकर . तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख. मंडळ कृषी अधिकारी उत्तम मंदावाड. पथक प्रमुख डी डी कांबळे. कृषी पर्यवेक्षक प्रकाश लांबोर. कृषी सहाय्यक समीर कदम आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राकेश हुले. कृषी तज्ञ समुदाय संघटक. व ग्रामस्थ उपस्थित होते.

