कुडाळ :
गोवा स्थित विमान कंपनी फ्लाय९१ च्या तिकीट्स आता पेटीएमवर उपलब्ध झाल्या आहेत. फ्लाय९१ने पेटीएमसोबत भागीदारी करून ऑनलाईन तिकीट सेवांचा विस्तार केला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
या भागीदारीमुळे फ्लाय९१च्या लाखो प्रवाशांना आता पेटीएमच्या माध्यमातून प्रवासासाठी तिकीट बुक करता येईल. पेटीएम ही भारतातील अग्रगण्य पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी आहे जी त्यांच्या लाखो सदस्यांना क्यूआर कॉडच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सोय देते.
गोवा स्थित फ्लाय९१ आणि पेटीएम ब्रँडची मालकी असलेली नोएडा स्थित वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) यांच्यातील भागीदारी गेल्या आठवड्यात झाली.
“पेटीएम तसेच इतर ऑनलाईन पेमेंट अँप्सवर फ्लाय९१ च्या तिकिट्स आता उपलब्ध आहेत याबद्दल आम्ही उत्साही आहोत. ही भागीदारी B2C चॅनलमध्ये आमची उपस्थिती आणि पोहोच लक्षणीयरीत्या वाढवणार, ज्यामुळे आपल्याला संभाव्य ग्राहकांच्या मोठ्या समूहाशी जुळण्यात मदत होईल. पेटीएमने स्वतःला एक पसंतीचे पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून शस्वीरित्या स्थापित केले आहे. हा प्लॅटफॉर्म प्रादेशिक शहरांमध्ये जास्त वापरला जातो. फ्लाय९१ आणि पेटीएम हे दोनही भारतातील टियर २ टियर ३ शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारते. पेटीएमवर आमच्या सेवा उपलब्ध करून, आम्ही प्लॅटफॉर्मवर विसंबून राहणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी फ्लाय९१ आघाडीवर आणत आहोत, त्यांच्या शहरांमध्ये आमच्या उड्डाण सेवांबद्दल जागरूकता वाढवत आहोत,”असे फ्लाय९१ एमडी मनोज चाको यांनी सांगितले.
“लाखो वापरकर्त्यांसाठी पेटीएम हे त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे अँप आहे, प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाचा लाभ आणि प्रवासासाठी विस्तृत श्रेणी प्रदान करणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे. फ्लाय९१ ऑनबोर्ड आल्याने आम्ही आमच्या वापरकर्त्यांना अधिक चांगली प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात सक्षम होऊ,” पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले.
फ्लाय९१ हे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून कार्यरत आहे आणि तोच त्याचा होम बेस आहे. सेवेच्या धोरणाचा भाग म्हणून ही विमान सेवा पुढील पाच वर्षात ५० हुन अधिक शहरांना ३० विमानांच्या ताफ्याने जोडण्याची योजना आखत आहे, ज्यात भारतातील टियर २ आणि टियर ३ शहरांवर लक्ष केंद्रित करेल. वर्तमानात फ्लाय९१ अगत्ती (लक्षद्वीप), बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग येथे उड्डाणे चालवते, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

