सिंधुदुर्ग जिल्हा आर्मी सिग्नलर ग्रुप यांच्या वतीने “सिग्नल कोर डे २०२५ साजरा
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा आर्मी सिग्नलर ग्रुप यांच्या वतीने “सिग्नल कोर डे २०२५” रविवार दि-०२ मार्च रोजी साळ, गोवा राज्यातील नामांकित फार्म 33 वॉटर पार्क येथे साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग सिग्नल ग्रुपचे सर्व माजी सैनिक सहकुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग चे संचालक, माजी सैनिक चंद्रशेखर जोशी व त्यांच्या सिग्नलर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
“जिम्मी हैं चिन्ह हमारा, तीव्र चौकस नारा” हे ब्रिद वाक्य असलेल्या सिग्नल ग्रुप सिंधुदुर्गचा कोर डे मोठ्या उत्साहात साजरा झाला, दीप प्रज्वलन नुकतेच निवृत्त झालेले आणि कार्यक्रम अध्यक्ष माजी सैनिक उमेश वेंगुर्लेकर, ऑ.लेफ्नंट(नि) यांच्या हस्ते करून व सिग्नल कोर गीत म्हणत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तसेच हुतात्मा व वीर मृत सैनिकांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व सिग्नल ग्रुपच्या माजी सैनिकांचा स्नेहचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच फार्म 33 व वॉटर पार्क चे मालक मेघश्याम राऊत यांचा देखील शाल,श्रीफळ, स्नेहचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
देशाच्या सिमेवर राहून अहोरात्र झटणाऱ्या सैनिकां मुळेच आपला देश सुरक्षीत आहे. आपले आई वडील, पत्नी, मुलं, नातेवाईक यांना दूर ठेवून, कौटुंबिक त्याग करून देशाची सेवा बजावणाऱ्या सैनिकांची सेवा करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, असे उद्गार कार्यक्रम प्रसंगी बोलताना फार्म 33 व वॉटर पार्क चे मालक मेघश्याम राऊत यांनी काढले.
यावेळी दिवस भरात मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत दुपारी स्नेहभोजन करण्यात आले. यानंतर वाॅटर पार्क स्लाईड्सवर व स्विमिंग पूल व रेन डान्सची मज्जा घेण्यात आली. सायंकाळी सहा वाजता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आर्मी सिग्नलर ग्रुपचे सर्व सदस्य व त्यांचे कुटुंब उपस्थित होते.