महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष विकास सावंत यांचा सत्कार
सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष विकास सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या संस्थेची बैठक तारकर्ली येथे आयोजित केली होती. यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बोलावले जाते त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर विविध प्रकारचे सोल्युशन्स सांगून मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष विकास सावंत यांच्या सत्कार बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सीए भाऊ केत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नागपूर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष भेंडे, विश्वास सहकारी बँकेचे विश्वास ठाकूर, कराड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ संचालक जोशी तसेच कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, देवगड अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि विविध अर्बन बँकेचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
