दोडामार्ग शिवसेने तर्फे महिला दिनानिमित्त “महिला जागृती मेळावा व विविध सांस्कृतीक कार्यक्रम”*
उपस्थित राहण्याचे महिला आघाडी तालुकाप्रमुख चेतना गडेकर यांचे आवाहन*
दोडामार्ग
महिला दिनाचे औचित्य साधून ०९ मार्च रोजी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दोडामार्ग मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच “महिला जागृती मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. सदरचा कार्यक्रम दोडामार्ग मधील महालक्ष्मी हॉल या ठिकाणी दुपारी अडीच वाजता होणार असून या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दोडामार्ग तालुका शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर यांनी केले आहे.
राज्याच्या विविध भागात महिला वर होणारे अत्याचार, महिला सबली करणाची गरज तसेच महिलांच्या विविध समस्या आणि अडचणी यावर या मेळाव्यामध्ये महिला जनजागृती करण्यात येणार असून महिला जिल्हाप्रमुख एड. सौ. निता सावंत कविटकर, दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस व उपास्थित मान्यवर या कार्यक्रम प्रसंगी विशेष मार्गदर्शन करणार आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वागत गीतासह, फुगडी,समई नृत्य,दिंडी तसेच लहान मुले व महिलांचे विविध प्रकारचे नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन सौ. चेतना गडेकर यांनी केले आहे.
