You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांना आश्वासनाचा विसर; भाजपा पदाधिकार्‍यांचा आरोप

पालकमंत्री उदय सामंत यांना आश्वासनाचा विसर; भाजपा पदाधिकार्‍यांचा आरोप

पालकमत्र्यांनी जाहीर करूनही सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची स्थापना नाही..

सिंधुदुर्गनगरी :

मागील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘पुढील प्रजासत्ताक दिना पर्यत सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापन करणार असे’, जाहीर केले होते. मात्र वर्ष झाले तरी नगरपंचायत करण्याबाबत काहीच हालचाली नाहीत. आश्वासनाचा पालकमंत्र्यांना विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना जाग आणून देण्यासाठी 26 जानेवारीला निदर्शने करणार, असा इशारा सिंधुदुर्गनगरी भाजपा शहर अध्यक्ष अमोल मालवणकर यांनी दिला आहे. जिह्याच्या विकासासाठी तत्पर व काटीबद्ध आहोत, असे म्हणणारे पालकमंत्री उदय सामंत यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय.

२६ जाने २०२० रोजीच्या भाषणात त्यांनी पुढील प्रजासत्ताकदीना चे ध्वजारोहण नगर पंचायत प्राणांगनात होईल, असे म्हटले होते मग त्यांनी वर्षभरात का नगरपंचायत केली नाही? असा सवाल केला आहे. सत्ता येणार नाही म्हणून का ? की खासदार आणि आमदार सांगतायत नको म्हणून, आपल्या पक्षात वाद आहेत ते चव्हाट्यावर येतील आणि आपली सत्ता येणार नाही? म्हणून नगरपंचायत होण्यासाठी टाळले जात आहे.

दोन गावात तर शिवसेनेचे सरपंच आहेत मग एवढे का घाबरण्याचे कारण काय ? जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून गेले ५ वर्षे अधीसूचना होऊनही आज पर्यंत काहीच हालचाल झाली नाही. अश्या स्वार्थी राजकारणामुळे गावांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, काहीच सुधारणा नाहीय. फक्त मोठी मोठी आश्वासने दिली जात आहेत.

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पण मोठी मोठी आश्वासने देऊन आश्वासन मंत्री म्हणून निवृत्त झाले, तुम्ही त्याची पुनरावृत्ती केली तर तुम्हालाही निवृत्त व्हावे लागेल. आपण दिलेला शब्द खरा करून दाखवा नाहीतर तुमचे प्रजासत्ताक दिनी निदर्शने करून आपले स्वागत करावे लागेल,असा इशारा भाजपाचे सिंधुदुर्गनगरी शहर अध्यक्ष अमोल मालवणकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा