You are currently viewing मराठी भाषा गौरव

मराठी भाषा गौरव

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगावचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार केळवदकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मराठी भाषा गौरव*

————————-

गावा गावात घूमते

राणात शीळ घालते

माय मराठी

जात्यावरची ओवी

गाते माय मराठी

 

मोटवरचे गाणे होई

झुळझुळ वाहते माय मराठी

व्हरंड्यातल्या शाळे मध्ये बोबडे बोल बोलते मराठी

 

वावरातल्या काळ्या

शिवारात डोलते मराठी

माळावरच्या वाऱ्या संगे पळते मराठी

 

पारवरल्या गप्पात रंगते झिंगते मराठी

मंदीरातल्या टाळा सोबत अभंग गाते

माय मराठी

 

बुध्दाच्या विहारात

करुणा सांगते मराठी

अथांग निळ्या आकाशात पंख लावूनी.. उडत असते

माय मराठी

 

ज्ञानेशाच्या ओवीत

भागवत शब्द ब्रम्ह प्राकृत मराठी

तुकारामाच्या अभंग गाथेत जागो जागी

विद्रोह करते माय मराठी

 

जगात साऱ्या डंका

तीचा उत्सव मराठी

आपण सारे लेकरे

तीची तिच्याचसाठी .

————————-

मनोहर पवार केळवदकर, चिखली, जि बुलढाणा .

संवाद -98508182651.

प्रतिक्रिया व्यक्त करा